हिंदू नववर्षाची सुरुवात मंगळवार, ९ एप्रिल २०२४ रोजी चैत्र प्रतिपदा विक्रम संवत २०८१ रोजी होणार आहे. या दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या आनंदाने साजरा केला जाईल. गुढीपाडव्याबद्दल बऱ्याच लोकांना अनेक प्रश्न देखील नक्कीच असतील. गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे? गुढीपाडवा का साजरा केला जातो? लोक हे देखील विचारतात की गुढी पूजन कसे करावे? गुढी कधी काढावी?. या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण आता पाहुयात. त्याआधी तुम्हाला कसतरी होतय च्या सर्व कुटुंबाकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो. नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.
गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे?
सृष्टीनिर्माणकर्ता ब्रह्मदेवाने ज्या दिवशी हे विश्व तयार केले तोच सतयुगाची सुरुवात म्हणून मानला गेला. यामुळे नवीन वर्षाची सुरुवात म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून प्रसिद्ध असलेला हा सण भारताच्या विविध भागात बैसाखी, उगादी, पुथंडु, विशु इत्यादी नावाने साजरा होतो.
सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि नवीन वर्षाची सुरुवात होते. वर्षाचा पहिला दिवस आनंद, उत्साह आणि शुभ गेल्यास संपूर्ण वर्ष हे शुभ जाईल अशील धारणा आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. ब्रह्मदेवाने नववर्षाच्या पहिल्या दिवसाला सर्वश्रेष्ठ पद दिले. म्हणूनच या दिवसाला चैत्र प्रतिपदा असे म्हणतात.
गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो?
प्रभू श्रीरामाने लंकापती रावणावरती विजय मिळवून आपला १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत पुन्हा प्रवेश केला. लोकांनी या मंगलप्रसंगी घरोघरी गुढी उभारून आपल्या राजाचे स्वागत केले. तो दिवस चैत्र प्रतिपदेचा होता जो पुढे गुढीपाडवा म्हणून साजरा केला जाऊ लागला. वाईट वृतींवर चांगल्या गुणांच्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा सण ओळखला जातो.
महाभारतात देखील गुढीपाडव्याचा उल्लेख आढळतो. उपरिचर नावाच्या राजाला इंद्राने एक काठी दिली. इंद्रदेवाची आराधना करण्यासाठी उपरिचर राजाने ती काठी मातीत रोवली आणि त्याची मनोभावे पूजा केली. महाभारतातील आदिपर्वात सांगितल्याप्रमाणे उपरिचर राजाचे अनुकरण इतर राजांनी केले. बांबूची काठी घेऊन त्याला रेशमी वस्त्र, गंध, फुलांचा हार इत्यादी लावून त्याची पूजा करण्याची ही परंपरा महाभारतापासून चालत आलेली आहे.
गुढीपाडवा किती तारखेला आहे?
२०२४ साली गुढीपाढवा हा ९ एप्रिल २०२४ रोजी असणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, विक्रम संवत २०८१ रोजी संपूर्ण भारतात गुढीपाडवा आनंदाने साजरा होईल. ८ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सुरु होणारी चैत्र शुद्ध प्रतिपदा ९ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ८ वाजून ३१ मिनीटांनी संपेल. शालिवाहन शके १९४६ तर विक्रम संवत २०८१ नववर्षाची सुरुवात या गुढीपाडव्यापासून होईल.
गुढीपाडवा पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला?
ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला सृष्टीची निर्मिती केली अशी अख्यायिका आहे. सतयुग/ सत्ययुगाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा साजरा होऊ लागला हा एक पौराणिक संदर्भ आहे. भगवान विष्णूचा सातवा अवतार प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश करताना आपल्या राजाचे स्वागत म्हणून आयेध्या वासियांनी घरोघरी विजयी पताका म्हणून गुढ्या उभारल्या. तेव्हापासून प्रत्येक चैत्र प्रतिपदेला गुढीपाडवा मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. गुढीपाडवा हा वाईट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तींचा विजयाचा सण आहे. यानुसार महाराष्ट्रामद्ये गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा चालू आहे.
आपण गुढी का उभारतो?
गुढी ही विजयपताका म्हणून उभारली जाते. ती विजयाची आणि समृद्धीची प्रतीक आहे. गुढीपाडवापासून नववर्षाची सुरुवात असते. चैत्र प्रतिपदा ही साडेतीन मुहूर्तांपैकी एक तिथी मानली गेली आहे. या दिवशी नवीन वस्तू घेणे, शुभ कामे करणे, गाडी व सोने खरेदी करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात.
अजून वाचा: गुढीपाडवा २०२४: यावर्षीचा पाडवा असणार आहे खास, जाणून घेऊ. एकाच वर्षात २ गुढीपाडवा?
गुढी किती वाजता उभारावी? कोणत्या दिशेला गुढी उभारणं शुभ मानलं जातं?
यावर्षी मंगळवार, ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडवा आहे. ८ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ११ वाजून ५० मिनिटांनीं चैञ शुद्ध प्रतिपदा सुरु होईल. ९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी लवकर उठून सूर्योदयानंतर गुढी उभारावी. घराच्या प्रवेशदारावर बहुदा उजव्या बाजूला पाटावरती गुढी उभारावी. रेशमी वस्त्र किंवा साडी एका बांबूच्या काठीला दोरीने बांधून त्यावर फुलांचा हार, गंध, कडुनिंबाची डहाळी, साखरेची गाठी बांधावी यावर तांब्याचे किंवा धातूचा भांडे बांधून गुढी दोरीने पक्की बांधून उभी करावी.
२०२४ मध्ये गुढीपाडवा कुठे आहे?
९ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र आणि भारतात गुढी पाडवा साजरा केला जाईल.
गुढी पूजन कसे करावे?
सकाळी लवकर उठून अंघोळ आदी कामे उरकून सूर्योदयानंतर घराच्या प्रवेशदारावर गुढी उभारावी. पाटाभोवती रांगोळी काढून गुढीची मनोभावे पूजा करारी. पुरणपोळी गोडाचा नैवद्य गुढीला दाखवावा. ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि गूळ यांचे मिश्रण कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून तो प्रसाद म्हणून खाणे. थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेऊन दिवसभरात आपली शुभ कार्ये करून घ्यावीत. संध्याकाळी गुढीला नमन करून सूर्यस्ताच्या वेळी गुढी उतरवावी.
गुढी कधी काढावी?
यावर्षी ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडवा असणार आहे . सकाळी लवकर गुढी उभारल्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी गुढीला नमस्कार करून अक्षता वाहून गुढी काढावी.
अजून वाचा: गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे? तो साजरा करण्यामागे ‘या’ अनेक कथा आहेत.
(या पानावरील माहिती इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या विविध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. वाचकांनी माहितीची सत्यता पडताळून पाहावी याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धा वा चुकीचे समज यांना दुजोरा देत नाही.)