वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवरती सध्या इन्फ्लुएंसरची खूप चलती आहे. मात्र त्यांचा किती आणि योग्य प्रभाव पडतोय का? हा एक सतावणारा प्रश्न आहे. रेडिट या सोशल प्लॅटफॉर्मवर एका वापरकर्त्याने ‘बिनकामाचे इन्फ्लुएंसर’ असे म्हणत आपला संताप व्यक्त केला.
What it means to be an influencer in Marathi? इन्फ्लुएंसर असणे म्हणजे काय?
इन्फ्लुएंसर म्हणजेच शुद्ध मराठी मध्ये प्रभावकर्ता. ज्ञान, कौशल्य किंवा अधिकाराच्या बळावर हे प्रभावकर्ते इतरांच्या कृती किंवा निर्णयावरती परिणाम करू शकतात. सोशल मीडियावरती जितके जास्त फॉलोवर्स तितका मोठा इन्फ्लुएंसर असे मानले जाते. मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या वस्तू व सेवांची जाहिरात करण्यासाठी, बऱ्याचदा या सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसरना पैसे देतात किंवा मोफत वस्तू आणि सेवा देतात.
Reddit वापरकर्त्याने “Nikamme influencers” असे का म्हटले?
“सामान्य माणसाला या इन्फ्लुएंसरचा नक्कीच फायदा होत आहे का? आणि हे इन्फ्लुएंसर एवढ्या फोल्लोवर्ससाठी पात्र आहेत का?” असे एका Reddit वापरकर्त्याने सांगून आपला संताप व्यक्त केला.
या इन्फ्लुएंसर कडून फक्त तुम्हाला जाहिराती पाहायला मिळतील मात्र ज्या वस्तूंची किंवा सेवांची ते जाहिरात करत आहेत त्याबद्दल त्यांना स्वतः किती माहिती आहे याबद्दल शंका असल्याचे या Reddit वापरकर्त्याने सांगितले. पैसे मिळत नसल्यास केवळ फ्री मध्ये चांगल्या वस्तूंची किंवा सेवांची जाहिरात हे इन्फ्लुएंसर कधीच करणार नाहीत असेही या Reddit वापरकर्त्याने पुढे सांगितले. या पोस्ट वरती बऱ्याच लोकांनी आपापली मते नोंदवली.
“केवळ श्रीमंत कुटुंबात जन्माला आल्यामुळे हे इन्फ्लुएंसर आपला अधिकार गाजवत आहेत.”, या मताशी बऱ्याच जणांनी आपली सहमती दर्शवली.
“इन्फ्लुएंसरना नेहमीच जास्तीत जास्त फॉलोवर्स ची हाव असते. त्यामुळे धडा शिकवण्यासाठी फक्त त्यांना अनफॉलो करा, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.”, असं तोडगा एका Redditer ने सुचवला.
हे इन्फ्लुएंसर केवळ पैसे मिळावे म्हणून कोणत्याही वस्तूंची किंवा सेवांच्या जाहिरात करतात. सध्या फारच कमी विश्वास ठेवू शकेल असे इन्फ्लुएंसर राहिले आहेत. अशी चिंता देखील बऱ्याच Reddit वापरकर्त्यांनी व्यक्त केली.