आपण बोलताना आपल्या तोंडातून जो मूळ ध्वनी ऐकायला येतो त्याला वर्ण असे म्हणतात. जेव्हा हे ध्वनी लिहिण्याची वेळ आली तेव्हा भाषेनुसार प्रत्येक आवाजाला एक विशिष्ट चिन्ह मानले गेले. या ध्वनिचिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो. अ-क्षर म्हणजे नष्ट ना होणारे. बोललेली गोष्ट हवेतच नष्ट होऊ नये म्हणून बोललेली गोष्ट लिहून ठेवण्याची वेळ आली.
आपली मराठी भाषा ही देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते. मराठी नीट समजण्यासाठी, वर्णमाला म्हणजेच मुळाक्षरे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही मराठी लिहायला आणि वाचायला शिकत असाल, तर त्याची सुरुवात मुळाक्षरापासून होते. या लेखात आपण मराठी मुळाक्षरे आणि ती कशी वाचायची ते पाहू.
मराठी वर्णमाला – मराठी मुळाक्षरे
मराठी भाषा लिहिताना देवनागरी लिपी वापरात असल्याने, देवनागरी लिपीतील १२ स्वर आणि ३६ व्यंजन ही मराठीतील एकूण ४८ मुळाक्षरे मानतात. सखोल अभ्यासकांसाठी सांगायचं तर मराठी भाषेत एकूण ५२ वर्ण आहेत आणि या ५२ वर्णांच्या मालिकेला वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे आपण म्हणतो.
मुळाक्षरे मराठी स्वर (१४)
अ, आ, इ, ई, उ, ऊ,
ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ,
ॲ, ऑ
मुळाक्षरे मराठी स्वरादी (२)
अं, अः
मुळाक्षरे मराठी व्यंजन (३६)
क, ख, ग, घ, ङ,
च, छ, ज, झ, ञ,
ट, ठ, ड, ढ, ण,
त, थ, द, ध, न,
प, फ, ब, भ, म,
य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ
मराठी स्वर – ज्या अक्षरांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येतो. ज्यांना दुसऱ्या अक्षरांची गरज भासत नाही अशा अक्षरांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार हा सहज, स्वतंत्र, इतर अक्षरांच्या मदतीशिवाय होतो. स्वरांचा उच्चार करताना ओठाला ओठ न चिटकता, तोंडातील कोणत्याही अवयवाशी जिभेचा स्पर्श न होता, हवेचा मार्ग न अडवता, तोंड उघडून आणि पसरून केला जातो.
मराठी स्वरादी – ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण दोन स्वरादी आहेत, जसे की, अं, अः स्वरादीमध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो. उदा. अ (स्वर आहे) + अनुस्वार =अं तसेच अ(स्वर आहे) + विसर्ग = अः
मराठी व्यंजन – व्यंजन म्हणजे अशी अक्षरे ज्याचा उच्चार करतांना जीभ ही तोंडातील विविध अवयवांना जसे की, कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ, स्पर्श करते. व्यंजनाचे एकूण ५ प्रकार पडतात. त्यातील १ प्रकार स्पर्श व्यंजन ही आपण नेहमीच्या देवनागरी लिपीत वापरतो. मराठी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. यामुळे देवनागरी लिपीतील मुळाक्षरे ही मराठी भाषेची मुळाक्षरे होतात. यानुसार मराठी भाषेत बारा स्वर आणि छत्तीस व्यंजने असतात.
मुळाक्षरे मराठी स्वर
अ आ इ ई उ ऊ
ए ऐ ओ औ अं अः
विशेष स्वर – ॲ,ऑ
इतर चार देवनागरी स्वर – ऋ, ॠ, ऌ, ॡ
मुळाक्षरे मराठी व्यंजन
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श ष स ह ळ क्ष ज्ञ
मुळाक्षरे मराठी स्वर वाचन
- अ अननस
- आ आवळा
- इ इमारत
- ई ईडलिंबू
- उ उशी
- ऊ ऊस
- ऋ ऋषी
- ए एडका
- ऐ ऐरण
- ओ ओढा
- औ औषध
- अं अंगठी
- अः प्रातःकाल
- अँ बॅट
- आँ रॉकेट
मुळाक्षरे मराठी व्यंजन वाचन
- क कमळ
- ख खडू
- ग गवत
- घ घर
- ङ अङ्क (अंक)
- च चटई
- छ छत्री
- ज जहाज
- झ झगा
- ञ मञ्जुषा (मंजुषा)
- ट टरबूज
- ठ ठसा
- ड डफली
- ढ ढग
- ण बाण
- त तबला
- थ थवा
- द दप्तर
- ध धरण
- न नथ
- प पणती
- फ फणस
- ब बगळा
- भ भटजी
- म मका
- य यज्ञ
- र रत्न
- ल लगोरी
- व वड
- श शहाळे
- ष षटकोन
- स सरडा
- ह हत्ती
- ळ गुळ
- क्ष क्षत्रिय
- ज्ञ ज्ञानेश्वर
मराठी भाषेत किती स्वर आहेत या प्रश्नाचे उत्तर हे विद्यार्थांनी त्यांच्या पाठयपुस्तकात दिलेले असेल त्याप्रमाणे समजावे. हा लेख मराठी मुळाक्षरे आणि देवनागरी लिपी यातील वर्णमाला सविस्तरपणे सांगतो. यातील काही अक्षरे ही कालानुरूप दैनंदिन वापरात आढळून येत नाहीत. अधिक माहितीसाठी मराठीचे शिक्षक व जाणकार मंडळींसोबत सल्लामसलत करावी. मराठी मुळाक्षरे लेखात काही सुधार करण्याची गरज असेल तर खाली कंमेंट बॉक्स मद्ये आम्हाला नक्की कळवा.