उन्हाळा जवळ आला की एक चांगला एअर कूलर Best Air Cooler खरेदी करण्यासाठी सर्वांची लगबग चालू होते. बाजारात विविध प्रकारचे विविध क्षमतेच्या आणि विविध किमतीचे एअर कुलर्स उपलब्ध आहेत. मात्र आपल्या कुटुंबासाठी सर्वात चांगला एयर कूलर कोणता हा नेहमीच एक सतावणारा प्रश्न असतो. यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत तीव्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात तुमचे घर थंड राखण्यासाठी बेस्ट इयर कुलर चे पर्याय आपण पाहूयात.
Types of Air Coolers | एअर कूलरचे प्रकार
Personal Air Cooler | वैयक्तिक एअर कूलर
वैयक्तिक एअर कुलर हे आकाराने लहान किंवा मध्यम आकाराच्या खोलीसाठी योग्य आहेत. हे एअर कुलर सहसा कमी ऊर्जा वापरणारे आणि मी खूपच कमी आवाज करणारे असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात शांततापूर्ण वातावरणात थंडावा देखील मिळेल. बजाज सिंफनी ओरिएंट आणि उषा सारखे अनेक एअर कुलर चे ब्रँड सध्या मार्केटमध्ये चलतीत आहेत.
Desert Air Cooler | डेझर्ट एअर कूलर
डिझेल एअर कूलर हे साधारण आकाराने मोठ्या असणाऱ्या रूम मध्ये वापरले जातात. जर तुमच्या घरातील वातावरण हे डेझर्ट सारखेच कोरडे असेल किंवा तुमच्या इथे उन्हाळ्यात कडाक्याचं ऊन पडत असेल तर डेझर्ट एअर कुलर हा एक उत्तम पर्याय आहे. डेझर्ट एअर कूलर मध्ये थंड होण्यासाठी पाण्याच्या मोठ्या टाक्या असतात. एअर कुलर हे साधारण एकदाच केली जाणारी इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे साधारण चार लोकांसाठी डेझर्ट एअर कुलर ला सर्वजण पसंती देतात.
Tower Air Cooler | टॉवर एअर कूलर
तुम्ही जर तुमच्या घरासाठी एक आकर्षक स्टायलिश आणि आधुनिक लुक देणार असाल तर टॉवर एअर कुलर हा उत्तम पर्याय आहे. आकाराने कॉम्पॅक्ट पण तितकेच पावरफुल टॉवर एअर कुलर हे आधुनिक कुटुंबासाठी पहिली पसंत आहे.
Window Air Cooler | विंडो एअर कूलर
जर तुमच्या घरात मोकळ्या जागेची कमतरता असेल तर विंडो एअर कुलर हा एक उत्तम पर्याय असू शकतो. विंडो एअर कुलर हे खिडकीवरती लावले जातात आणि त्यातून प्रभावीपणे घरातील वातावरण अत्यंत थंड राखले जाते.
How to choose the Best Air Cooler? योग्य एअर कुलर ची निवड कशी करावी?
या उन्हाळ्यात बेस्ट एअर कुलर Best Air Cooler ची खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची खात्री करून घ्या.
एअर कुलरच्या कूलिंग पॅड ची जाडी: चांगल्या कामगिरीसाठी कमीत कमी 50 मिमी जाडीच्या कूलिंग पॅड ची निवड करा.
व्हेरिएबल स्पीड कंट्रोल: तुमच्या कूलिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ॲडजस्टेबल स्पीड सेटिंग्ज असणारा कूलर निवडा.
बिल्ट-इन कॅस्टर: एअर कुलर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हलवण्यासाठी त्याला योग्य चाकांची गरज असणे गरजेचे आहे.
कमीतकमी आवाज करणारा: हेअर कुलर मुळे खोली थंड राखण्यासोबतच कमी आवाज हा देखील महत्त्वाचा आहे.
वॉटर लेवल इंडिकेटर: एअर कुलर मध्ये पाण्याची किती पातळी शिल्लक राहिलेली आहे हे इंडिकेटर मधून समजते.
Why you should Buy Air Cooler? एअर कूलर का खरेदी करावा?
एयर कंडीशनर म्हणजेच एसी चा पर्याय उपलब्ध असताना एअर कूलर का खरेदी करावा हा प्रश्न नेहमीच तुम्हाला पडत असेल. या दोन्ही वस्तूंचे काम एकच असले तरी एअर कूलर हा एक सोपा पर्याय आहे.
प्रभावी किंमत: एअर कूलर हे योग्य किमतीला उपलब्ध आहेत तसेच ते कमी इलेक्ट्रिसिटी वापरत असल्यामुळे तुम्हाला लाईट बिल देखील कमी येते
ओलावायुक्त हवा: एअर कूलर हे कोरड्या हवेमध्ये ओलावा तयार करतात त्यामुळे तुम्हाला एक ओलावा युक्त ताजी हवा मिळते.
ओपन डोअर कूलिंग: तुम्हाला जर तुमच्या घरात एसी बसवायचा असेल तर बंदिस्त खोलीची आवश्यकता आहे. मात्र एअर कूलर हे तुम्ही कोणत्याही खोलीमध्ये सहज बसू शकता. एअर कुलर वापरासाठी कोणतीही वेगळी तजवीज करण्याची आवश्यकता नाही.
Air Cooler FAQs | एअर कुलर बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे
घरगुती वापरासाठी कोणत्या प्रकारचे एअर कूलर सर्वोत्तम आहेत?
तुमच्या आवश्यकतेनुसार एक मध्यम आकाराचा एअर कुलर तुम्ही घरगुती वापरासाठी वापरू शकता. कोणताही एअर कूलर खरेदी करण्यासाठी तुमच्या खोलीचा आकार आणि उपलब्ध जागा याचा नक्की विचार करा
मी माझ्या एअर कूलरमधील कूलिंग पॅड किती वेळा बदलावे?
चांगल्या कामगिरीसाठी साधारण प्रत्येक उन्हाळ्यात नवीन कूलिंग पॅड वापरणे गरजेचे आहे. तुम्ही जर वर्षभर एअर कुलर वापरणार असाल तर दर चार ते सहा महिन्यांनी हे कूलिंग पॅड नक्की बदलावे. सतत पाण्याचा मारा असल्यामुळे काही काळानंतर एअर कुलर मधून शेवाळ वास येण्यास चालू होतो. कूलिंग पॅड किती लवकर खराब होतील हे तुमच्या येथील पाण्याच्या कॉलिटी वर देखील अवलंबून आहे. त्यामुळे साधारण दर चार महिन्यांनी कुलिंग पॅड बदलणे गरजेचे आहे.
एअर कुलर खरेदी करण्यासाठी काही डिस्काउंट किंवा सवलती कशा मिळवाव्यात?
कोणताही एअर कुलर खरेदी करण्यापूर्वी त्याच्या ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स साइट्स वरती किमती नक्की पहाव्यात. या वेबसाईट वरती नेहमीच काही ना काही डिस्काउंट ऑफर चालू असतात. तसेच येथे क्रेडिट कार्ड वरती किंवा डेबिट कार्ड वरती ईएमआय ची सुविधा देखील उपलब्ध आहे.
तर यावर्षीचा कडक उन्हाळा एअर कुलरचा साथीने सुसह्य बनवा. खाली काही बेस्ट इयर कुलर ची माहिती दिलेली आहे यातून तुम्ही तुमच्या घरासाठी योग्य असणारा एअर कुलर खरेदी करू शकता.
List of Best Air Cooler to buy in 2024
Bajaj 36L Personal Air Cooler with TurboFan Technology

बजाज एअर कुलर म्हणजे तुमच्या खोलीमध्ये तुमचा वैयक्तिक कुलर असल्यासारखा आहे. बजाज एअर कुलर थंड हवा फिरवण्यासाठी टर्बो फॅन तंत्रज्ञानाचा उपयोग करतो.
बजाज एअर कुलर ची क्षमता ही 36 लिटर पाणी सामावेल एवढी आहे त्यामुळे तो बराच काळ खोली थंड ठेवण्यासाठी पुरेसा आहे. या एअर कुलर मध्ये डूरा मरीन पंप बसवला असल्यामुळे तो पाण्यापासून सुरक्षित राहतो. बजाज एअर कुलर ला एक वर्षाची वॉरंटी आहे व तुम्ही अधिकची दोन वर्ष वॉरंटी घेऊ शकता. बजाज एअर कुलर हे अँटीबॅक्टरियल पॅडचा वापर करतात. त्यामुळे तुमचे जिवाणूंपासून संरक्षण होण्यास मदत होते. तुम्हाला ताजी आणि स्वच्छ थंड हवा मिळते. बजाज एअर कुलर मध्ये ऍडजेस्टेबल थ्री स्टेप सेटिंग आहे त्यामुळे तुम्हाला किती थंड हवा पाहिजे हे तुम्ही नियंत्रित करू शकता. एअर कुलरला खाली चाके असल्यामुळे तुम्ही हा कुलर खोलीमध्ये इकडून तिकडे ढकलून नेऊ शकता. बजाज एअर कुलर मधील खास तंत्रज्ञानामुळे एअर कुलर च्या समोर जशी थंड हवा फेकली जाईल त्याप्रमाणे त्याच्या बाजूला देखील थंड हवेची झुळूक तयार होत राहील.
Crompton 75L Desert Air Cooler

550 स्क्वेअर फुट एवढ्या मोठ्या खोलीसाठी क्रॉम्प्टनचा हा एअर कुलर सर्वात योग्य पर्याय आहे. क्रॉम्प्टनच्या या एअर कुलर मध्ये 75 लिटर पाणी मावते. या एअर कूलर ने खोलीच्या सर्व कोपऱ्यात अगदी थंड वाऱ्याची झुळूक तयार होईल. क्रॉम्प्टन एअर कुलर हा ऊर्जा कार्यक्षम आहे. काही कारणाने पावर कट झाल्यास हा एअर कुलर इन्वर्टर वर देखील चालू शकतो. यातील खास वापरलेले कूलिंग पॅड्स हे हवेला थंडगार बनण्यास मदत करतात. क्रॉम्प्टन एअर कुलर खोलीतील सर्व दिशांना समान थंड हवा पसरवतात. क्रॉम्प्टनचा हा एअर कुलर साफ करण्यासाठी सोपा आहे तसेच यावर कोणताही गंज चढणार नाही. या एअर कुलर मध्ये ऑटोफिल पाणी भरण्याची सेवा उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला वारंवार पाणी भरण्याची गरज लागणार नाही. क्रॉम्प्टनच्या या एअर कुलर ला एक वर्षाची वॉरंटी आहे.
Bajaj 24L Personal Air Cooler with TurboFan Technology

36 लिटर बजाज एअर कुलर चा हा लहान आकारातील एअर कूलर आहे. या एअर कुलर मध्ये 24 लिटर पाण्याची क्षमता आहे. त्यामुळे तुमची खोली ही थंड राहील आणि कमी जागा व्यापली जाईल. या 24 लिटर पाण्याची क्षमता असलेल्या एअर कुलर मध्ये ओलावा पासून संरक्षित करणारा DuraMarine पंप, स्वच्छ आणि ताजी हवा मिळण्यासाठी अँटी बॅक्टेरियल कूलिंग पॅड, टर्बो फॅन टेक्नॉलॉजी आणि ऍडजेस्ट करता येणारा एअर फ्लो अशी सर्व वैशिष्ट्ये आहेत. चाकांची रचना दिल्यामुळे हा एअर कुलर एका खोलीतून दुसरीकडे हलवण्यास सोपा आहे. बजाजच्या या 24 लिटर एअर कुलर ला एक वर्षाची वॉरंटी आहे आणि तुम्ही आणखीन दोन वर्ष वॉरंटी वाढवू शकता.
Symphony Diet 12T Tower Air Cooler

सिंफनी 12 डायट एअर कुलर हा 12 स्क्वेअर मीटर आकाराच्या रूम साठी उत्तम एअर कुलर आहे. बेडरूम किंवा छोट्या ऑफिससाठी हा एअर कुलर तुम्ही खरेदी करू शकता. सिंफनी एअर कुलर मध्ये आय-प्युअर टेक्नॉलॉजी वापरली आहे. ज्यामध्ये त्यात एक मल्टी स्टेज फिल्टर वापरला आहे. जो प्रदूषण, दुर्गंध, एलर्जीकारक घटक फिल्टर करून ताजी व स्वच्छ हवा देण्यास मदत करतो. हा एअर कुलर तुमच्या खोलीमध्ये सर्वत्र समान थंड हवा पसरवण्यास मदत करेल. यात वापरलेल्या शक्तिशाली ब्लोअरमुळे हवा त्वरित थंड करण्यास मदत होते. बटन दाबून पंखा चालू करण्यासारखा हा एअर कुलर काम करेल. कमी वीज वापरून जास्त थंड हवा देण्यास हा एअर कुलर प्रयत्नशील आहे. त्यामुळे याचा इन्वर्टरवर देखील तुम्ही वापर करू शकता. सिंफनी डाएट एअर कुलर हा कमी जागेमध्ये बसवण्यासाठी बनवला गेलेला आहे. चार चाकांची रचना दिलेली असल्यामुळे हा एअर कुलर एका खोलीतून दुसरीकडे फिरवण्यास मदत होते. सिंफनी 12 डाएट एअर कूलर ला एक वर्षाची वॉरंटी आहे.
Candes 12 L Portable Mini Air Cooler for Home

कॅंडीज 12 लिटर एअर कुलर हा घर आणि ऑफिसच्या वापरासाठी अगदी योग्य एअर कुलर आहे. 12 लिटर टाकी असलेल्या या एअर कुलर ला बर्फाचा एक खास चेंबर दिलेला आहे. हा एअर कुलर अगदी थंड हवा खोलीमध्ये सर्वत्र पसरवेल. कॅंडीज एअर कुलर मध्ये वापरलेले मल्टी स्टेज फिल्टरमुळे, प्रदूषक आणि एलर्जीकारक घटक वगळले जातात आणि तुम्हाला थंड, स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळण्यास मदत होते. त्यामध्ये वापर केलेला हाय स्पीड ब्लोअर मुळे भरपूर हवा त्वरित खोलीमध्ये पसरवता येते. वापरण्यास अगदी सोपी बटणे या एअर कुलर वरती दिलेली आहेत. तसेच याचे डिझाईन देखील खूप मोहक आहे. कॅंडीज एअर कुलर हा इन्व्हर्टर वर देखील तुम्ही चालवू शकता. यात दिलेली वर्टीकल ऑटो स्विंग आणि डस्ट फिल्टर ही वैशिष्ट्ये विशेष मदतगार आहेत.
HIFRESH Air Cooler for Home and office

तुमच्या सर्व पॅरामीटर्स मध्ये अगदी मिळून येणारा एअर कुलर म्हणजे हायफ्रेशचा एअर कूलर. या एअर कुलर मध्ये 4 लिटर पाण्याचे टाकी आहे तसेच यामध्ये आईस पॅक टाकण्याची सोय आहे. हा कुलर आठ तासापर्यंत तुम्हाला थंड हवा देत राहतो. तीन स्पीडचे कंट्रोल आणि चार वेगवेगळे मोड असलेला हा एयर कूलर त्याच्या ऊर्जा बचत करण्याच्या आणि शांत आवाजात काम करण्याच्या कौशल्यासाठी ओळखला जातो. या एअर कूलर मध्ये तुम्हाला एलईडी टच स्क्रीन, रिमोट कंट्रोल, ड्युअल टेंपरेचर कंट्रोल ही वैशिष्ट्ये मिळतात. हायफ्रेश एअर कुलर मधील पाण्याची टाकी तुम्ही वेगळी करून स्वच्छ करू शकता तसेच यातील कूलिंग पॅड देखील स्वच्छ करण्यासाठी वेगळी काढली जाऊ शकतात. हा एअर कुलर तुम्ही इन्वर्टर वर देखील वापरू शकता आणि अगदी कमीत कमी जागेमध्ये हा एअर कुलर मावतो.
Symphony Ice Cube 27 Personal Air Cooler (27L, White)

27 लिटर पाण्याची टाकी असलेल्या या एअर कूलर मध्ये पाण्याच्या पातळीचा इंडिकेटर देखील आहे. त्यामुळे तुम्हाला पाणी रिफिल करण्यास कसलीही अडचण भासणार नाही. हा एअर कुलर खूप कमी ऊर्जा वापरतो त्यामुळे तुम्ही तो इन्व्हर्टर वर देखील चालवू शकता आणि तुमची ऊर्जेची बचत देखील होते. या एअर कुलरला एक वर्षाची वॉरंटी मिळते व खाली दिलेल्या चार चाकांवर तो एका रूम मधून दुसऱ्या रूममध्ये सहज हलवता येतो. चार जणांचे कुटुंब असणाऱ्या खोलीसाठी किंवा छोट्या ऑफिससाठी हा एअर कुलर एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या एअर कुलर मध्ये हवा प्रदूषण आणि एलर्जीकारक घटक फिल्टर करण्याची सोय दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला बराच काळ ताजी, स्वच्छ आणि थंड हवा मिळते.
Symphony HiFlo 40 Personal Air Cooler (40L, Light Grey)

सिंफनी कंपनीच्या या एअर कूलर मध्ये 40 लिटर पाण्याची टाकी आहे. बाकी सर्व एयर कूलर सारखेच सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये तुम्हाला या एअर कुलर मध्ये देखील मिळतात. या एअर कुलरला एक वर्षाची वॉरंटी आहे. या एअर कुलर मध्ये पाण्याची पातळी दाखवणारा निर्देशक आहे आणि जास्त क्षमतेची पाण्याची टाकी असल्यामुळे हा एअर कुलर खूप काळपर्यंत तुम्हाला थंड हवा पुरवत राहील.
Hindware Frostwave 38L Personal Air Cooler (White & Grey)

तुम्हाला शांतपणे चालणारा आणि जास्त आवाज न करणारा, प्रभावी, थंड हवा सर्वत्र पसरवणारा एअर कुलर हवा असेल तर तुम्ही हिंदवेअर चा हा स्मार्ट एअर कुलर घेऊ शकता या एअर कुलर मध्ये तुम्हाला मोठ्या ब्लेडचा फॅन मिळतो ज्यामुळे भरपूर ताजी आणि थंड हवा रूममध्ये फेकली जाते. तुम्हाला पाण्याची पातळी दर्शवणारा निर्देशक मिळेल. हा एअर कुलर खोली थंड आणि आरामदायी ठेवण्यासाठी डिझाईन केलेला आहे.
Ekvira High Speed Cooler Fan (White)

एकविरा हाय-स्पीड एअर कुलर हा आकाराने कॉम्पॅक्ट असणारा आणि पोर्टेबल एअर कुलर आहे. तुम्ही तो तुमच्या बैठक खोली मध्ये, स्वयंपाक घर किंवा छोट्या ऑफिस मध्ये वापरू शकता. या एअर कुलरचे एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये USB मोबाईल चार्जिंग देखील समाविष्ट आहे. त्यामुळे तुमची खोली थंड राहण्यासोबतच तुमचे मोबाईल चार्ज करण्याची सोय देखील उपलब्ध होते. या एअर कूलर ची साफसफाई करणे सोपे आहे.
तर हे होते सर्वात जास्त खरेदी केले जाणारे बेस्ट क्वालिटी चे एअर कुलर. हा उन्हाळा अगदी सोयीस्कर आणि सुखकर करण्यासाठी तुम्ही यातील कोणताही एक एअर कूलर खरेदी करू शकता. एअर कुलर चे वेगवेगळे प्रकार, एअर कुलर खरेदी करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जावा तसेच टॉप 10 बेस्ट एअर कुलर ची लिस्ट तुम्ही आत्ताच पाहिली. एअर कुलर खरेदी करताना तुम्हाला आलेला अनुभव आणि या लिस्ट व्यतिरिक्त इतर काही एअर कुलर तुम्हाला सुचवायचे असतील तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
10 Best Air Cooler to buy in 2024 (Updated)
- Bajaj 36L Personal Air Cooler with TurboFan Technology
- Crompton 75L Desert Air Cooler
- Bajaj 24L Personal Air Cooler with TurboFan Technology
- Symphony Diet 12T Tower Air Cooler
- Candes 12 L Portable Mini Air Cooler for Home
- HIFRESH Air Cooler for Home and office
- Symphony Ice Cube 27 Personal Air Cooler (27L, White)
- Symphony HiFlo 40 Personal Air Cooler (40L, Light Grey)
- Hindware Frostwave 38L Personal Air Cooler (White & Grey)
- Ekvira High Speed Cooler Fan (White)