‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका झी मराठीवर १८ मार्च २०२४ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेबद्दल प्रचंड उत्साह जरी दिसून येत असला तरी बऱ्याच लोकांनी मालिकेच्या नावाबद्दल आपली नाराजगी देखील व्यक्त केली आहे. Navari Mile Hitler La Cast मध्ये राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भूमिजा पाटील आणि सानिका काशीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी टीव्ही वरील गुड्डन तुमसे ना हो पायेगा या हिंदी मालिकेवर या मालिकेची मूळ कथा आधारित आहे. या मालिकेचे इतर भाषेतील एपिसोड सुद्धा झी च्या विविध चॅनेल वरती प्रसिद्ध आहेत. तेलुगू मद्ये ‘हिटलर गारी पेल्लम’, तमिळ मद्ये ‘थिरुमती हिटलर’, मल्याळम मद्ये ‘मिसेस हिटलर’, कन्नड मद्ये ‘हिटलर कल्याणा’, बंगाली मद्ये ‘तोमार खोला होवा’, उडिया मद्ये ‘तू खारा मु छाई’ आणि पंजाबी भाषेत ‘हिर तेड्डी खीर’.
२०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘हिटलर दीदी’ मालिकेसोबत नावाचं साध्यर्म
काही वर्षांपूर्वी ZEE टीव्हीवर ‘हिटलर दीदी’ नावाचा असाच एक कार्यक्रम होता. 7 नोव्हेंबर 2011 रोजी सुरू झालेल्या या मालिकेची संपूर्ण कथा ही दिल्ली शहरात घडते. मात्र त्यावेळी देखील काहींना ‘हिटलर’ हे शीर्षक त्रासदायक वाटले. उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये, ही मालिका “जनरल दीदी” म्हणून ओळखली जात होती. त्यावेळी या मालिकेतील हिटलर दीदी ची प्रमुख भूमिका रती पांडे @ratipandey यांनी केली होती.
Social मीडिया वरती Mixed Reactions
सध्याच्या ZEE Marathi वर येणाऱ्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेसाठी बरेच प्रेक्षक उत्सुक आहेत. Reddit वापरकर्त्यांनी मालिकेबद्दलची त्यांची प्रतिक्रिया भरभरून नमूद केली आहे.
नवरी मिळे हिटलरला मधील सहकलाकार Navari Mile Hitler La Cast
‘नवरी मिळे हिटलरला’ या मराठी मालिकेत राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भूमिजा पाटील आणि सानिका काशीकर यांच्या प्रमुख भूमिका असतील.

राकेश बापट @raqeshbapat
‘नवरी मिळे हिटलरला’ मध्ये AJ, ज्याला अभिराम जहागीरदार म्हणूनही ओळखले जाते याची भूमिका राकेश बापट करतील. AJ ला त्याच्या धडाकेबाज दिसण्यासाठी, शिस्त आणि वक्तशीरपणासाठी ‘हिटलर’ असे टोपणनाव दिले जाते. घरातील सर्वजण मिळून त्याला बायको मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.
अजून वाचा: बाळाची ॲक्टिव्हिटी आणि प्ले टाईम झपाट्याने वाढण्यास ‘या’ वस्तू मदत करतील.

वल्लरी विराज @vallari_20
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कन्नी मराठी चित्रपटातील अभिनेत्री वल्लरी विराजने ‘लीला’ ही भूमिका साकारली आहे. लीला जेव्हा अभिरामला भेटते तेव्हा त्यांच्या भेटीत काय काय घडणार हे पाहणं मजेशीर असणार आहे.

शर्मिला शिंदे @sharmilarajaramshindeactor
शर्मिला शिंदे यांनी जहागीरदार कुटुंबातील सर्वात मोठी सून दुर्गा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. दुर्गा ही पहिली सून असल्याने अभिरामशी तिचे विशेष नाते आहे. तिला अभिरामचा इतिहास माहीत आहे. तीन सुनांमध्ये दुर्गा शिस्तप्रिय, हुशार, जबाबदार आणि व्यवहारी आहे.

सानिका काशीकर @sanika_kashikar
सानिका काशीकरने लक्ष्मी जहागीरदार या धूर्त आणि मत्सरी सुनेची भूमिका केली आहे. तिचे पात्र हे मधल्या सुने चे आहे. तिला कुटुंबात दुर्गा म्हणजे मोठ्या सुनेचे स्थान हवे आहे आणि त्यासाठी ती हुशारीने विविध डाव साधण्याचा प्रयत्न करत असते.
अजून वाचा: लहान मुलांसाठी ‘या’ सामानांची मोठया प्रमाणात खरेदी होतेय.

भुमीजा पाटील @bhumija_arvind_patil
भूमिजा पाटील सरस्वती जहागीरदार या धाकट्या सुनेच्या भूमिकेत आहे. सरस्वती स्वभावाने प्रेमळ आहे आणि तिच्या लग्नानंतर ती एका शिस्तबद्ध कुटुंबात येते. ती तिच्या पतीवर मनापासून प्रेम करते. तिचा निरागस स्वभाव अनेकदा गंभीर प्रसंगांना विनोदात बदलतो.
एकंदरीत…
झी मराठीवर १८ मार्च २०२४ रोजी ‘नवरी मिळे हिटलरला’ चा पहिला एपिसोड होणार असून, त्याच्याबद्दल च्या ऑनलाइन विविध प्रतिक्रिया आपण पाहिल्या. राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भूमिजा पाटील आणि सानिका काशीकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका उत्साह आणि Nostalgia यांचे मिश्रण असेल अशी आशा आहे. एकंदरीत ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका झी मराठीवरील इतर मालिकेसारखीच मनोरंजन घेऊन येणार आहे यात शंका नसावी.