11 Best Business Ideas in Maharashtra for 2024 | महाराष्ट्रात मोठी मागणी असणारे ११ सर्वोत्तम सेवा-आधारित व्यवसाय

आपले महाराष्ट्र राज्य समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशासाठी ओळखले जाते. याप्रमाणेच तुमची स्वतःची व्यावसायिक यशोगाथा तयार करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी मागणी असणाऱ्या ११ सर्वोत्तम सेवा-आधारित व्यवसायांची माहिती घेऊयात.

11 Best Business Ideas in Maharashtra for 2024

महाराष्ट्र राज्य हे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या आणखी बऱ्याच गजबजलेल्या शहरांचे आणि समृद्ध खेड्यांचे घर आहे. मुंबई या सर्वात प्रसिद्ध शहराचा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे.

Event Management Business Idea । इव्हेंट मॅनेजमेंट

महाराष्ट्रात २०२४ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट सेवांची मागणी वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या शहरांमधील वेगवान जीवनशैलीमुळे वाढदिवस, विवाहसोहळा, कौटुंबिक सोहळा आणि व्यावसायिक सभा यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी इव्हेंट मॅनेजरची मोठी मागणी आहे. ही मागणी केवळ पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरात मर्यादित नसून संपूर्ण राज्यभरात आहे.

महाराष्ट्राची झपाट्याने होणारी वाढ आणि लोकांच्या सामाजिक स्तरामद्ये होणारी वाढ, इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायाला अनुकूल आहे. गजबजलेल्या शहरी जीवनापासून ते शहरांच्या सांस्कृतिक समृद्धीपर्यंत, वर्षभर कार्यक्रम आणि उत्सवांची संख्या वाढत आहे. शिवाय, भव्य उत्सवांची राज्याची परंपरा आणि भव्य कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या सेलिब्रिटींची उपस्थिती यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट उद्योगाला आणखी चालना मिळते आहे. तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती विविध पोस्ट टाकून तुमच्या कामाची जाहिरात करू शकता. डिजिटल प्लॅटफॉर्म स्वीकारणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विक्रेत्यांसह चांगले संबंध राखले तर महाराष्ट्राच्या बाजारपेठेत इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायांची भरभराट होण्याची शक्यता खूप जास्ती आहे.

Catering Business Idea । केटरिंग

महाराष्ट्रात लग्न व विविध कार्यक्रमांसाठी चविष्ट पदार्थ बनवण्याचा व्यवसाय हा २०२४ साठी योग्य पर्याय ठरेल. छोट्या मेळाव्यांपासून ते मोठ्या विवाहसोहळ्यांपर्यंत जेवण बनवणे व वाढणे ही कामे तुम्हाला मिळू शकतात. वाढदिवसाची पार्टी असो किंवा कॉर्पोरेट इव्हेंट, लोकांना त्यांचे कार्यक्रम खास बनवण्यासाठी केटरर्सची गरज असते. ज्यांना स्वयंपाक करणे आणि लोकांना जेवणातून आनंदी करणे आवडते त्यांच्यासाठी केटरिंग व्यवसाय सुरू करणे ही एक चांगली कल्पना आहे.

मोठ्या शहरात केटरिंगला नेहमीच मागणी असते. होम केटरर्स विशेषतः लोकप्रिय आहेत, जे खास कार्यक्रमांसाठी घरगुती अन्न देतात. विशेषत: गृहिणी आणि तरुण उद्योजकांसाठी केटरिंग हा अगदी सोपा आणि लगेच चालू करता येईल असा व्यवसाय आहे.

11 Best Business Ideas in Maharashtra for 2024 Catering Business

Digital Marketing Agency । डिजिटल मार्केटिंग एजन्सी

२०२४ च्या डिजिटल युगात, विविध कंपन्या मार्केटिंगसाठी ऑनलाइन माध्यमे वापरात आहेत. या बदलामुळे लहान व्यवसायांनाही जागतिक स्तरावर सहज पोहोचता येते. तुम्ही तुमच्या शहरात डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालू केल्याने तुम्हाला मोठा फायदा होत राहील. डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालू करण्यासाठी सुरुवातीला साधारण १ लाख ते २० लाख रुपये लागू शकतात. भारतातील डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात २०२३ ते २०२८ पर्यंत ३०.२ टक्के एवढ्या दराने वाढ होत राहील असा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील बरेच व्यवसाय हे ऑनलाईन जाहिरात आणि मार्केटिंग करण्याचे फायदे ओळखू लागले आहेत. त्यामुळे अशा व्यवसायांना सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), कंटेंट तयार करणे आणि वेबसाइट डेव्हलपमेंट यासारख्या डिजिटल मार्केटिंग सेवा पुरवल्यास मोठा फायदा होईल. प्रभावीपणे अंमलात आणल्यास हा व्यवसाय राज्यातील २०२४ मद्ये सर्वात फायदेशीर व्यवसाय असल्याचे सिद्ध होऊ शकते.

डिजिटल मार्केटिंग एजन्सी नक्की काय काम करते?

डिजिटल मार्केटिंग एजन्सी सर्व डिजिटल मार्केटिंग गरजांसाठी एक सोल्यूशन म्हणून काम करते. सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, वेबसाइट्स आणि ब्लॉग्स सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून या एजन्सी खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन जाहिरात करतात. गेल्या काही वर्षात डिजिटल मार्केटिंग एजन्सीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.

11 Best Business Ideas in Maharashtra for 2024 Cleaning Services

Cleaning Services । स्वच्छता सेवा

महाराष्ट्रातील गजबजलेल्या शहरांमध्ये, घर आणि कार्यालयातील स्वच्छता करण्यासाठी विश्वासू आणि मेहनती लोकांची नेहमीच मागणी असते. साफसफाईची सेवा सुरू करणे म्हणजे झाडलोट करणे, रंगकाम, घरबदल करणे इत्यादी सेवांचा समावेश होतो.

स्वच्छता सेवा देणारा व्यवसाय चालू करायला कमीतकमी गुंतवणूक आवश्यक आहे. यासाठी तुमच्याकडे फक्त मूलभूत साफसफाईची साधने आवश्यक आहेत. जास्ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यावरील मोठ्या डिस्प्ले बोर्डवर तुमच्या सेवांची जाहिरात करा. मोठ्या कंपन्यांमद्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, कंपन्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला स्वच्छता सेवेचा लाभ होऊ शकतो.

औद्योगिक इमारती आणि हॉस्पिटलमद्ये स्वच्छता सेवांची मागणी वाढत आहे. अशी सेवा सुरू करणे ही एक स्मार्ट चाल असू शकते.

Beauty Salon । ब्युटी पार्लर

महाराष्ट्रात ब्युटी पार्लर सुरू करणे ही एक चांगली कल्पना आहे. शहरांप्रमाणेच आता गावागावात देखील लग्न व इतर कार्यक्रमांसाठी मेकअप आर्टिस्टची मागणी आहे. सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. यामुळेच भविष्यात या व्यवसायाला अजून मागणी असणार आहे. तुम्ही लग्न आणि पार्टीसाठी लोकांचा मेकअप करू शकता. कधीकधी मोठे मेकअप ब्रँड तुम्हाला तुमच्या सलूनसाठी भागीदारीमद्ये विविध मार्केटिंग च्या वस्तू पुरवतात. सध्या मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी ऑनलाईन विविध कोर्सेस उपलब्ध आहेत.

Photography Business Idea । छायाचित्रण

फोटोग्राफी करण्याचा तुमचा छंद हा एका व्यवसायात बदलणे ही एक विलक्षण कल्पना आहे. योग्य परवानगी घेऊन तुम्ही घरी पोर्ट्रेट स्टुडिओ सेट करू शकता. लग्नासारख्या विशेष कार्यक्रमांचे फोटो काढण्याचा विचार करा. विवाहसोहळा बहुतेक आठवड्याच्या शेवटी असतो. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करून फोटोग्राफर म्हणून पार्ट टाईम देखील काम करू शकता.

दुसरा पर्याय म्हणजे तुमचे फोटो ऑनलाइन विकणे. अनेक कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट्स आणि जाहिरातींसाठीही फोटो आवश्यक असतात. Shutterstock आणि iStockphoto सारख्या वेबसाइट्स यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहेत.

अनेक मॉडेल्सना त्यांचे पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी परवडणाऱ्या छायाचित्रकारांची गरज असते. तुम्ही ते छायाचित्रकार होऊ शकता. चांगल्या छायाचित्रकारांची मागणी नेहमीच असते. तुम्ही स्टॉक फोटोग्राफी देखील एक्सप्लोर करू शकता. थोडक्यात सांगायचं तर फोटोग्राफी मद्ये पुढे विलक्षण संधी उपलब्ध आहेत.

11 Best Business Ideas in Maharashtra for 2024 Photography Services

Recruitment । नोकऱ्या देणे आणि खाजगी कंपन्यांना योग्य लोकांना शोधण्यात मदत करणे.

महाराष्ट्रात विशेषत: शहरात जॉब कन्सल्टन्सी सुरू करणे ही एक विलक्षण कल्पना आहे. वाढत्या स्टार्टअपमुळे आणि रोजगाराच्या वाढत्या संधींमुळे, योग्य व्यक्तींना नोकरीच्या संधींशी जोडणाऱ्या कंपन्यांना जास्त मागणी आहे. विविध कंपन्या त्यांच्या कंपनीत काम करण्यासाठी योग्य लोकांच्या शोधात असतात. मात्र नोकर भरतीची ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि त्रासदायक तसेच कंपनीच्या मूळ कामापासून अगदी वेगळी असते. म्हणूनच नोकरीच्या भूमिकेसाठी योग्य उमेदवार शोधण्यासाठी या कंपन्या जॉब कन्सल्टन्सी फर्मना पैसे देतात. महाराष्ट्रातील मोठ्या कंपन्यांना योग्य कर्मचारी शोधण्यात या कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावतात. नोकरी देणारे म्हणून, तुम्ही कंपनी आणि नोकरी शोधणाऱ्या अशा दोघांनाही मदत कराल, विशेषत: महाराष्ट्र राज्यात जेथे अनेकजण कामाच्या शोधात आहेत.

एक रिक्रूटमेंट फर्म सुरू करण्यासाठी, तुम्हाला नोकरीच्या भरती क्षेत्रात मजबूत नेटवर्कची आवश्यकता असेल. तुम्ही ऑनलाइन पोर्टलवर नोकरीच्या संधींची यादी करू शकता किंवा संभाव्य उमेदवारांशी थेट संपर्क साधू शकता. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रात कार्यालये स्थापन केल्यामुळे, वाढीसाठी भरपूर संधी आहेत. एक ठोस नेटवर्क तयार करून आणि उच्च दर्जाच्या सेवा प्रदान करून, तुमची भर्ती फर्म महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात नावारूपाला येऊ शकते.

11 Best Business Ideas in Maharashtra for 2024 Babysitting

Babysitting । बेबीसिटिंग

घरातून काम करणाऱ्या महिलांसाठी बेबीसिटिंग आणि चाइल्ड केअर सेवा या व्यवसायाच्या आधुनिक संधी उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही. फक्त खेळणी, खाट, गाद्या, डिस्पोजेबल डायपर, अँटीसेप्टिक लोशन आणि काही मूलभूत पुरवठा घ्यावा लागेल.

शहरात बाहेर दिवसभर काम करणाऱ्या जोडप्यांची संख्या अधिक असल्याने बेबीसिटिंग आणि बालसंगोपन सेवांची मागणी वाढत आहे. पालकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह डेकेअर सेंटरची आवश्यकता असते जिथे त्यांची मुले सुरक्षित राहतील आणि इतर मुलांबरोबर खेळू आणि शिकू शकतील.

डेकेअर सेंटर सुरू करण्यासाठी जागा भाड्याने घेणे, बालसंगोपनाचा अनुभव असलेल्या महिलांना नियुक्त करणे आणि सुरक्षा उपाय सेट करणे आवश्यक असू शकते.

अजून वाचा: बाळाची ॲक्टिव्हिटी आणि प्ले टाईम झपाट्याने वाढण्यास ‘या’ वस्तू मदत करतील.

Mobile Repair and Recharge Shop । मोबाईल दुरुस्ती आणि रिचार्ज शॉप

मोबाईल दुरूस्ती आणि रिचार्जची दुकाने नेहमी ग्राहकांनी गजबजलेली असतात, विशेषत: महाराष्ट्रात जिथे मोबाईल फोन अत्यावश्यक आहेत. अनेकदा मोबाईल फोनला दुरुस्ती किंवा रिचार्जची आवश्यकता असते. हा एक कमी गुंतवणुकीचा व्यवसाय आहे ज्यातून चांगले उत्पन्न मिळते.

मोबाइल दुरुस्तीचे दुकान सुरू करण्यासाठी, तुम्ही ऑनलाइन किंवा जवळपासच्या संस्थांमधून मोबाइल दुरुस्तीचा कोर्स करू शकता. ग्रामीण भागात किंवा खेड्यापाड्यात असे दुकान उघडणे अधिक फायदेशीर ठरू शकते. दुरुस्ती आणि रिचार्ज सोबत, तुम्ही इअरफोन्स, चार्जर आणि बरेच काही मोबाईल ॲक्सेसरीजची विक्री देखील करू शकता.

मोबाईल फोनचा वापर अधिक वाढल्याने छोट्याश्या समस्यांमुळेही गैरसोय होऊ शकते. यामुळे मोबाईल दुरुस्तीचे दुकान हे महाराष्ट्रातील एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय बनेल. देशभरात मोबाइल फोन वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येमुळे, मोबाइल दुरुस्ती सेवा बाजारपेठ पूर्ण क्षमतेने विकसित होत आहे.

Fitness Training । फिटनेस प्रशिक्षण

महाराष्ट्रात फिटनेस आणि वेलनेस सेंटरची स्थापना केल्याने आरोग्यदायी जीवनशैलीच्या वाढत्या मागणीला पूरक व्यवसाय होईल. फिटनेस प्रोग्राम्स, योगासन, स्पा सेवा आणि आरोग्यविषयक सल्लामसलत इत्यादी सेवा विविध लोकांना आकर्षित करू शकतात. उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रशिक्षित आणि प्रमाणित तज्ञ असणे महत्वाचे आहे. विविध शहरात जिथे आरोग्याबाबत जागरूकता झपाट्याने वाढत आहे, तिथे फिटनेस आणि वेलनेस क्षेत्रात कामाला मोठा वाव आहे. लोक वैयक्तिक फिटनेस आणि पोषण तज्ञांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत, ज्यामुळे हा एक आर्थिकदृष्ट्या फायद्याचा व्यवसाय आहे.

प्रशिक्षक म्हणून फिटनेस क्लब, जिम आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये भरपूर संधी आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या सेवांचा प्रचार करून फिटनेसमधील तुमच्या पात्रतेचा फायदा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देऊन त्यातून भरपूर पैसे कमावू शकता.

11 Best Business Ideas in Maharashtra for 2024 Fitness Trainer

Education Business Idea । ऑनलाईन कोर्सेस

तुमच्या विविध कौशल्यावर आधारित शैक्षणिक कोर्सेस तयार करणे फायदेशीर ठरू शकते. इंग्रजी, संगीत, स्वयंपाक किंवा डिझाइन यांसारख्या विविध विषयांचे कोर्सेस तयार करून तुम्ही विकू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे कोर्सेस एकदाच बनवायचे आहेत आणि ते नंतर तुम्ही हव्या तेवढ्या लोकांना विकू शकाल. ऑनलाईन कोर्सेस बरोबर होम ट्यूशन आणि ऑनलाइन लाईव्ह प्रोग्राम घेणे हा उत्तम मार्ग आहे. आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन शिकवणी अधिकाधिक लोकप्रिय झाली आहे.

अजून वाचा: लहान मुलांसाठी ‘या’ सामानांची मोठया प्रमाणात खरेदी होतेय.

समारोप

तर हे होते तुमच्यासाठी महाराष्ट्र फायदेशीर ठरतील असे सेवा-आधारित व्यवसाय. लक्षात असुद्या, सर्वच व्यवसाय हे तुमच्यासाठी योग्यच असतील असे नाही. कोणताही व्यवसाय चालू करण्याआधी योग्य आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. व्यवसायात दुकान थाटणे खूप सोपे काम आहे मात्र व्यवसाय चालू करण्याआधी तुमच्याकडे कस्टमर असणे महत्वाचे आहे. ते नसल्यास निदान कस्टमर कोठून अनंत येतील याचे पूर्ण नियोजन करूनच व्यवसायात उतरा. स्वतःची व्यावसायिक यशोगाथा तयार करण्याच्या कामात तुम्हाला कसतरीहोतय डॉट कॉम च्या सर्व कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा.

आता ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा

केवळ महत्वाच्या निवडक बातम्याच तुम्हाला पाठवल्या जातील. आमची Privacy Policy वाचा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Bestsellers in Baby Products – KasatariHotay.com